Pune Crime News: अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्याने या महिलेने असे काही केले की वाचून धक्काच बसेल

एमपीसी न्यूज : स्वतःच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्याने पुण्यातील एका महिलेने इनकम टॅक्स विभागाच्या सहआयुक्त महिला अधिकाऱ्याला सोशल मीडियावर अश्लील मॅसेज पाठवून जीवन उद्धवस्त करण्याची धमकी दिली. हा प्रकार जुन २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिला अधिकाऱ्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सपना नामक एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी या सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात त्या राहण्यास आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राचे आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध होते. यातून त्यांना एक मुलगा झाला होता. दरम्यान मागील काही वर्षापासून आरोपी महिलाही फिर्यादीच्या मित्राला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैसे उकळत होती. फिर्यादी महिला हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे फिर्यादीच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला नाही.

दरम्यान या प्रकरणाचा राग मनात धरून आरोपी महिलेने फिर्यादी यांची बदनामी सुरु केली. तक्रारदार महिलेचे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट आहेत. आरोपी महिला तक्रारदार यांच्या युट्युब व्हिडीओवर अश्लील कमेंट करत कामूक भावना निर्माण केल्या. त्यानंतर त्यांना व्हॉट्सअप आणि टेक्सट मॅसेजद्वारे अश्लील कमेंट केल्या. त्यानंतर फेसबुकवर देखील कमेंटकरून बदनामी सुरू केली. तसेच, तुझे जीवन उद्धवस्त करेन व तुझा जॉब घालवेल व सामाजिक स्वास्थ् खराब करण्याची धमकी दिली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.