Pune News : काँग्रेसने स्वच्छ केलेल्या पायरी बाबत चंद्रकांत पाटील म्हणाले…

एमपीसी न्यूज – भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिका इमारतीच्या ज्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला, ती पायरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वेळातच गोमुत्र आणि गुलाबपाण्याने धुवून काढली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘काँग्रेस कार्यकर्त्यांचा गाई आणि गोमुत्रावरचा विश्वास वाढलाय, यांचा मला आनंद आहे.’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या पुणे पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पालिकेच्या पायरीवरच सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यात ते पायरीवरून खाली पडले, त्यानंतर त्यांना दवाखान्यात देखील दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी भाजप कार्यकर्ते आणि सोमय्या पालिकेत दाखल झाले.

सोमय्या ज्या पायरीवरून खाली पडले त्याच पायरीवरून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. पण हा सगळा प्रकार संपतो न संपतो तोच ज्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला, ती पायरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वेळातच गोमुत्र आणि गुलाबपाण्याने धुवून काढली. त्यामुळे नवीन वाद सुरू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.