Navale bridge Accident: नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी अपघात

एमपीसी न्यूज : एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.

नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला.  त्यात एका थिनर घेऊन निघालेल्या टँकरने १० ते १२ वाहनांना धडक दिली. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत. यावेळी सेल्फी गार्डन मध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.