Kidney Smuggling Case : रुबी हॉस्पिटलचे डॉ. परवेज ग्रँट यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा (Kidney Smuggling Case) प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह ज्या महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती तिच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा डॉक्टरांचा देखील समावेश आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रुबी हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु ठरलेले पैसे न दिल्यामुळे या महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. सुरुवातीला या महिलेला 15 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. मात्र किडनी काढून घेतल्यानंतर केवळ चार लाख रुपयांवर तिची बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Dighi Crime News : मुलीच्या लग्नात झालेला खर्च तिच्या सासरच्यांकडून मिळवून देण्याच्या बहाण्याने एक लाखांची फसवणूक

या संपूर्ण प्रकरणाला (Kidney Smuggling Case) जबाबदार धरत रुबी हॉल क्लिनिकचे डॉ परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. संजोग सिताराम कदम यांनी फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.