Pune Crime News : उच्चशिक्षित सुनेचा छळ, औंध येथील उद्योजक कुटुंबासह आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : उच्चशिक्षित सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पुण्याच्या औंध परिसरातील बड्या उद्योजकाच्या कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि 498 (अ), 323, 325, 406, 420, 506, 34 आणि हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  27 वर्षीय पिडीत विवाहीतेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा. औंध, पुणे), सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड) दिपाली विरेंद्र पवार (रा. औंध, पुणे), भागीरथी पाटील, राजु अंकुश (सध्या रा. सांगवी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2017 मध्ये फिर्यादी महिलेचे गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड याच्यासोबत लग्न झाले. लग्न झाले तेव्हा पासून दागिने आणि हुंड्याच्या कारणावरून आरोपी पीडितेला त्रास देत होते. लग्नातील चांदीची भांडी, पूजेचे साहित्य, पीडितेचा पासपोर्ट, डिग्री सर्टिफिकेट, पॅन कार्ड आणि अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड यांनी फिर्यादीला त्रास देण्याच्या उद्देशाने सुस गाव येथील फार्महाऊस वर दडवून ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याशिवाय सासरे नानासाहेब गायकवाड, सासु नंदा गायकवाड यांच्यासह इतर आरोपींनी देखील त्रास दिल्याचा आणि गणेश उर्फ केदार गायकवाड यांनी मारहाण केल्यामुळे पीडित तिचा उजवा कान कायमस्वरूपी बहिरा झाल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.