Laxmanbhau Jagtap : टायगर इज बॅक! आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा रुग्णालयाच्या बाल्कनीतून कार्यकर्त्यांना नमस्कार

एमपीसी न्यूज – जवळपास मागील महिनाभर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात एका दुर्धर आजारावर उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे (Laxmanbhau Jagtap) भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. नुकतेच आमदार लक्ष्मणभाऊ यांनी रुग्णालयाच्या बाल्कनीत उभे राहून  समर्थकांना हातवारे करत मी ठणठणीत असल्याबद्दल सांगितले. त्यांची ही प्रसन्न मुद्रा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कार्यकर्त्यांनी स्टेट्स ठेवत टायगर इज बॅक अशी टॅगलाईन दिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारासाठी दाखल करत असतांना त्यांची तब्येत अतिशय नाजूक अवस्थेत होती. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु होत्या. भाऊंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील देवांना नवस, महाआरत्या करण्यात आल्या. त्यांच्यासाठी अमेरिकेतून इंजेक्शन मागविण्यात आले. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. आता तब्येतीत कमालीची सुधारणा झाली.

Pune News : दळवी हॉस्पिटलमध्ये तातडीच्या प्रसूती ऑपरेशनची सुविधा द्या – ‘आप’ ची मागणी

आमदार लक्ष्मणभाऊ यांनी नुकतेच रुग्णालयाच्या (Laxmanbhau Jagtap) बाल्कनीत येवून चाहते, समर्थक, कार्यकर्त्यांना हातवारे करत नमस्कार केला.  भाऊंची हास्यमुद्रा पाहून कार्यकर्त्यांमध्ये आनंद, सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. भाऊ लवकरच रुग्णालयातून घरी येऊन कामाला सुरुवात करतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनेक आजी-माजी मंत्री यांनी रुग्णालयात जाऊन आमदार जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.