Pune News: पत्नीला काळी म्हणून हिनवणे पडले महागात, वाचा काय झालं ? 

एमपीसी न्यूज: पत्नीला सतत काळी म्हणून हिनवणे, त्रास देने आणि हुंड्याची मागणी करणे पती आणि सासूला भलतेच महागात पडले आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक बांदल आणि सुनंदा बांदल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 27 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सासरी नांदत असताना पती आणि सासूने तू काळी आहेस, तुला मुले सुद्धा काळीच होतील. तुझे कपडे ठेवण्यासाठी आमच्याकडे कपाट नाही. तू एकटी गावी जाऊन शेती कर नाहीतर तुला सोडून देईन. माहेरच्यांनी फ्लॅट घेऊन द्यावा आणि पाच तोळे सोन्याचे कडे द्यावे यासाठीदेखील आरोपीने फिर्यादीचा सतत छळ केला. सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर फिर्यादीने कोथरूड पोलीस स्टेशन राहतात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.