Pimpri News: ‘नो-लॉकडाउन, निर्बंध’ कडक करा; मास्कविना फिरणा-याला 500 ऐवजी 5 हजार रुपये दंड आकारा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोरोना हा संपण्याच्या दिशेने चालला आहे. कोरोनाचे स्वरुप भयावह नाही. कोरोना नॉर्मल सर्दी, खोकल्यासारखा झाला आहे. त्यावर आजच चांगली गोळीही आली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन करणे योग्य होणार नाही. पण, निर्बंध कडक लावण्याबाबत कोणाचीही असहमती नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. सर्व रुटीन चालू ठेवायचे पण काळजी घ्यायची. मास्क नाही लावला तर 500 च्या ऐवजी 5 हजार रुपये दंड करावा.त्यातून सर्वसामान्यांना मेटाकूटीला आणाल. परंतु, कडक निर्बंध लादावेत, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत्या असल्याने आजपासून कडक निर्बंध लावले आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, कडक निर्बंधबाबतीत कोणाचीही असहमती नाही. लॉकडाउनला मात्र आता कोणीही तयार होणार नाही. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरतील. दोन वर्षे हा मानसाच्या जीवनातील फार मोठा कालावधी आहे. विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक सफर झाले. त्यांनी दोन वर्षे सहन केले. त्यामुळे सर्व रुटीन चालू ठेवायचे पण काळजी घ्यायची. मास्क नाही लावला तर 500 च्या ऐवजी 5 हजार रुपये दंड करावा. त्यातून सर्वसामान्यांना मेटाकूटीला आणाल. परंतु, कडक निर्बंध लादावेत. लग्न समारंभ, संभा संमलने 50 लोकांच्या उपस्थित करावेत. ऑफीस बंद करा, 50 टक्के उपस्थिती ठेवा, दुकाने, शाळा, कॉलेज बंद ठेवल्याने काही होणार नाही.

मी काही डॉक्टर नाही. अनेकजण डॉक्टर नसतानाही आपण डॉक्टर, कंपाऊंडर असल्याचा दावा करतात. तसा मी डॉक्टर आणि कंपाऊंडरचाही दावा करत नसल्याचे सांगत पाटील म्हणाले, मी वाचतो खूप, त्याच्यातून कोरोना हा संपण्याच्या दिशेने चालला असल्याची माहिती मिळते. त्यामुळे कोरोनाचे स्वरुप भयावह नाही. कोरोना नॉर्मल सर्दी, खोकल्यासारखा झाला आहे. त्यावर आजच चांगली गोळीही आली आहे. बिघडलेले अर्थकारण जरा रुळावर यायला लागले आहे. त्याचा विचार केला पाहिजे. ‘नो-लॉकडाउन कडक निर्बंध’ करावेत.

तर, लोक म्हणतील लय शहाणा झालायं!

सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढताना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, निर्बंध सर्वांनीच पाळले पाहिजेत. परंतु, दुर्बीन घेऊन बसण्याचे काही कारण नाही. शेवटी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याला दिवसभरात फिरावे लागते. कोणासोबत सेल्फीसाठी तो उभा नाही राहिला. तर, त्यावर टिका-टिप्पणी होईल. लय शहाणा झाला. सेल्फीही काढू देत नाही. शेवटी राजकारणात काम करणा-या मानसाला सगळे नियम पाळताना तारेवरची कसरत होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला दुर्बीन घेऊन बसण्याचे कारण नाही. पण, नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत. छोटे कार्यक्रम करायलाच लागतील. मोठे कार्यक्रम बंद केले पाहिजेत. जनजीवन ठप्प करुन चालणार नाही. लोक वेडे होतील. त्यामुळे कमी नियम सांभाळून कमी संख्येचे कार्यक्रम करायला पाहिजेत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.