Pune: सहा महिन्यांचे दुकान भाडे, वीज बिल माफ करा; सलून व पार्लर असोसिएशनची मागणी

Pune: Six months shop rent, electricity bill waived; maharashtra Saloon and parlour Association's demand to the government शासनाला सलून बंद ठेवायचे असल्यास सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- ‘मिशन बिगिन अगेन’ असे म्हणत राज्य सरकारने गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील बाजारपेठ हळुहळु सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, हे करताना सरकारने अद्याप सलून सुरु करण्यास हिरवाकंदील दिलेला नाही. त्यामुळे सलून व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सलून व्यावसायिकांबद्दल अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने राज्य सरकारने सलून सुरू करण्यासंदर्भात नवी नियमावली तयार करावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे. तसेच सहा महिन्यांचे दुकान भाडे, वीज बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली

शासनाला सलून बंद ठेवायचे असल्यास सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी काशिद यांनी केली आहे.

महाराष्ट्रात 15 लाख कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. हे सर्व व्यावसायिक असंघटित आणि हातावर पोट अवलंबून असणारे आहेत. त्यामुळे सरकारने सलून व्यावसायिकांसाठी नवीन नियमावली जाहीर करून चालू करण्यास परवानगी द्यावी, असे काशिद यांनी म्हटले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

* दिल्ली तसेच उत्तरप्रदेश व कर्नाटक सरकारने दिलेल्या अर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सलून व पार्लर व्यावसायिकांना तत्काळ अर्थिक मदत द्यावी.

* सहा महिन्यांचे दुकान भाडे व लाइट बिल माफ करण्यात यावे. तसा आदेश राज्य सरकारने काढावा.

* केशकर्तन कामगारांचे बोर्ड कार्यान्वित करून निधी उपलब्ध करून द्यावा; तसेच अध्यक्ष निवडावा.

* नवीन नियमावलीत संपूर्ण महाराष्ट्रात सलून व्यवसाय सशर्त चालू करण्यास परवानगी द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.