Pune: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ‘दहावी नंतर काय’ वेबिनारला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

या वेबिनारला 130 जणांची उपस्थिती होती. हा अकरावी प्रवेश विषयक माहिती देणारा वेबिनार रविवारी पार पडला.

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोथरूड कर्वेनगर शाखेच्या वतीने आयोजित ‘दहावी नंतर काय’ या वेबिनारला 130 जणांची उपस्थिती होती. हा अकरावी प्रवेश विषयक माहिती देणारा वेबिनार रविवारी पार पडला.

एन एम व्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक व कॅप प्रवेश कमिटी सदस्य सचिन हलदूले यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी हलदूले यांनी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रिया, अर्ज भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच संकेत स्थळ व नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोथरूड शाखेचे अध्यक्ष माधव तिळगूळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महिला अध्यक्षा भारती भोपळे, डॉ. अरुण व चित्रा जोशी, अनिरुद्ध पळशिकर, नेहा तिळगूळकर, जयश्री घाटे, स्मिता इनामदार, कुंदा बीडकर यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी केले. डॉ.अचला दीक्षित यांनी सरस्वती वंदना सादर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.