Pune News : लसीकरणात पुणे देशात अव्वल,एका दिवसात टोचले तब्बल 2 लाख डोस

एमपीसी न्यूज :  राज्यात पुणे जिल्हा मंगळवारीकरोना प्रतिबंधक लसीकरणात अव्वल ठरला असून, एका दिवसात (दि. 31 ऑगस्ट) दोन लाखांच्यावर लसीकरण झाले. याशिवाय पुणे विभागात तीन लाखांच्यावर लसीकरण झाले. राज्य सरकारकडून येणारा साठा आणि एका खासगी कंपनीने दान केलेल्या साठ्यामुळे ही कामगिरी केली आहे. यामुळे लसीकरणात पुणे देशात अव्वल ठरले आहे. 

यापूर्वी 26 जून रोजी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे एक लाख 29 हजार लसीकरण झाल्याचा विक्रम होता. पुण्यात सर्वाधिक दुसरे डोस लाभार्थी होते. त्यामुळेच त्याला राज्यातून जास्त साठा मिळाला आणि एका खासगी कंपनीने दिलेल्या देणगीने त्या दिवशी मोहिमेला चालना दिली. 700 हून अधिक केंद्रांवर लसीकरण केले. मंगळवारी सायंकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात एकाच दिवसात 2,21,134 लस दिल्याची नोंद झाली होती.

पुणे जिल्ह्याव्यतिरिक्‍त संपूर्ण पुणे मंडळाने लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहे. याचे कारण जिल्ह्याकडे उपलब्ध साठा जास्त आहे. पुणे मंडळाने 3,04,000चा टप्पा ओलांडला, पुण्यामध्ये 2,21,000 लसी देण्यात आल्या आणि त्यानंतर सोलापूरला 55,000 चे डोस झाले. याव्यतिरिक्‍तचे डोस सातारा येथे झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.