Pune Traffic Police : सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गात पुणे वाहतूक पोलिसांचा अडथळा

एमपीसी न्यूज : विठ्ठलवाडी ते पु.ल.देशपांडे पार्क या (Pune Traffic Police) रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाहनधारक पर्यायी रस्त्याचा अपेक्षेप्रमाणे वापर करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) वाहतूक पोलिसांना पर्यायी मार्गाचा वापर करून सिंहगड रस्त्यावर येताना रस्त्यातील दुभाजक काढण्याची विनंती केली आहे.

मात्र, जोपर्यंत फनटाईम सिनेमा ते राजाराम पूल दरम्यानचा उड्डाणपूल पूर्ण होत नाही, तोपर्यंत दुभाजक हटवणार नाही, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे रस्त्याचा अपेक्षेप्रमाणे वापर होत नसल्याने वाहनधारकांना काही मीटर अंतराचा ‘चलाव’ करावा लागत आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीही कायम आहे.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पु.ल.देशपांडे पार्क या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाने सर्व कामे पूर्ण केली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करूनही सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरूच असून याला वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विठ्ठलवाडी ते पु.ल.देशपांडे पार्क हा रस्ता अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने रखडला होता. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने राजाराम पूल ते फनटाईम सिनेमा दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. पर्यायी पाच रस्ते कागदावरच राहिले असताना उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे.

एक ते दीड किलोमीटर अंतरासाठी (Pune Traffic Police) वाहनचालकांना 45 मिनिटे प्रवास करावा लागतो. पर्यायी मार्गाचा वापर अपेक्षित नसल्याने सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचा ताण कायम आहे. पु.ल.देशपांडे उद्यानात आल्यानंतर स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनधारकांना काही मीटर अंतराचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वाहनचालकांच्या सोईसाठी रस्ते विभागाने वाहतूक पोलिसांना पु.ल.देशपांडे उद्यानासमोरील दुभाजक हटवून तेथे वाहतूक नियंत्रण दिवे बसविण्यास सांगितले.

मात्र, वाहतूक पोलिसांनी तो फेटाळून लावत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दुभाजक काढता येणार नसल्याचे महापालिकेला कळवले. त्यामुळेच या रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून होत नसल्याचा दावा महापालिकेच्या रस्ते विभागाने केला आहे.

Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसह 14 जणांवर पुन्हा मोक्का

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. डोणजे, खडकवासला, किर्किटवाडी, नांदेड शहर, धायरी, वडगाव, सनसिटी, माणिकबाग या ठिकाणी जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. सध्या विठ्ठलवाडी ते फनटाईम सिनेमा या कॅनॉल रोडचा वापर वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

पर्यायी रस्त्यांच्या तरतुदी:Pune Traffic Police

सिंहगड रोड फ्लायओव्हर – 40 कोटी
लगड वस्ती ते सावित्री गार्डन – 55 लाख
राजयोग सोसायटी ते लगड वस्ती – 50 लाख
इंडियन ह्यूम पाईप ते सर्व्हे क्रमांक 32 कोटी
धायरी फाटा ते उंब्राय गणपती रस्ता – 55 लाख

पीएमसीचे रस्ते विभाग मुख्य अभियंता व्हीजी कुलकर्णी म्हणाले, की “विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे पार्क या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, खोळंब्यामुळे त्याचा वापर कमी होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

रेरा 139 प्रकल्पांवर करणार कारवाई; एक महिन्याची कारणे दाखवा नोटिस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.