Pune : महापालिकेला पाणी टंचाईचा फटका; मागविले दोन टँकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील काही महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून आज चक्क पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे आज (गुरुवारी) पुणे महापालिकेत दोन पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली.

याबाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा आज पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असून उद्या सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेत नागरिकांची गर्दी अधिक होत असते. पाणीपुरवठा बंद असल्याने आज दोन टँकर मागवावे लागल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.