Sinhgad News : सिंहगडावर फिरायला गेलेल्या 177 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई 

एमपीसी न्यूज – वर्षाविहारासाठी सिंहगडावर गेलेल्या अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.

पुणे पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवसांत पोलिसांनी 177 जणांवर ही दंडात्मक कारवाई करत 88 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.