Ravet : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेचा खून

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या (Ravet ) महिलेकडे प्लंबरने प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार देत हा प्रकार पोलिसांना सांगणार असल्याचे म्हटले. या कारणावरून प्लंबरने महिलेला मारहाण करत तिचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 13) रावेत येथील फेलिसिटी सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये घडली.

प्रतिमा प्रमोद यादव (वय 32, रा. फेलिसिटी सोसायटी, रावेत. मूळ रा. बिलासपुर, छत्तीसगढ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद रामेश्वर यादव (वय 34) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरिफ झुल्फिकार मल्लीक (वय 21, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद यादव यांचे कुटुंब रावेत येथील फेलिसिटी सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले आहेत. प्रमोद यादव आणि त्यांची पत्नी प्रतिमा हे दोघेही त्याच सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करत होते. तर आरोपी हा त्या सोसायटीमध्ये प्लंबिंगचे काम करत होता.

Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार, आता उमेदवारांची उत्सुकता

बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रतिमा कामावर गेल्या. त्या सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये काम करत असताना आरिफ याने त्यांच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच आपण प्रेम संबंधात राहू असे म्हटले. याला प्रतिमा यांनी विरोध केला.

तसेच हा प्रकार आपल्या पतीला व पोलिसांना सांगणार असल्याचे सांगितले. याचा (Ravet) राग आल्याने आरिफ याने प्रतिमा यांचा गळा आवळला. तसेच हाताने मारहाण केली. त्यानंतर प्रतिमा यांना भिंतीवर ढकलून दिले. यामध्ये प्रतिमा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची चौकशी करत पोलिसांनी आरोपी आरिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=SMr_YX0RQAg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.