Corona Vaccine Registration : आता कोरोना लसीकरण नोंदणी करा थेट पोस्ट ऑफिस मधून

एमपीसी न्यूज : कोरोनाविरोधातील लढाईत प्रमुख अस्त्र्ा असणाऱ्या लसीकरण मोहिमेत टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना लसीकरणासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

त्याचबरोबर संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टपह्न नाही पिंवा ज्यांच्याकडे पह्न असला तरी नोंदणी करताना समस्या येत आहेत ते आता जवळच्या पोस्ट ऑफिसची मदत यासाठी घेऊ शकतात.

तेलंगणाच्या ग्रामीण भागात नुकतीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे स्मार्टपह्न आहेत, पण ते कोविन अॅप योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम नाहीत अशा व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. तेलंगणातील 36 पोस्ट ऑफिस, 643 सब पोस्ट ऑफिस आणि 10 ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.