Pune Traffic Police : नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांवर बंधने; पुढील आदेशापर्यंत कारवाई थांबवली!

एमपीसी न्यूज : वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने ( Pune Traffic Police) अडवून दंडात्मक कारवाई आणि मोठा दंड करू नये, असे आदेश पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक शाखेला दिले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि दंडात्मक कारवाईला प्राधान्य देणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारावर ताण येणार आहे. 

वाहनचालक उपस्थित असतानाही ‘नो पार्किंग’मधून वाहने उचलून बेकायदेशीर टोइंग शुल्क आकारणे आणि चालक पावती घेण्यास तयार असतानाही टोईंगचा आग्रह धरणे, वाहन उचलणाऱ्या तरुणांकडून थकबाकी व पंचिंग मशिन त्यांच्या ताब्यात दिल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकारांविरोधात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांना केवळ वाहतुकीचे नियमन करण्याचे आदेश दिले आहेत. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक पोलिसांनी कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये,’ असे आदेश कर्णिक यांनी वाहतूक शाखेला दिले.

वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस प्रामुख्याने ‘ई-चलान मशिन’ वापरतात. अपवादात्मक परिस्थितीत रोख दंड देखील स्वीकारला जातो. सध्या वाहतूक विभागातील सर्व ई-चलन मशिन पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने वाहतूक पोलिसांना कारवाई थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

Singhad incident : एक सेल्फी पडली महागात; सिंहगडावर 8 ते 10 जणांना चावल्या मधमाश्या!

वरिष्ठांच्या आदेशानंतरही ( Pune Traffic Police) रस्त्यावरील वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी चौकावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष शाखेचे कर्मचारीही रस्त्यांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केले आहे.

वाहतूक पोलिस कारवाई करू इच्छित नसले, तरी बेशिस्त वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बेदरकारपणे वाहन चालवणे आणि धोकादायक वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ( Pune Traffic Police) कारवाई करण्यात येणार आहे.

राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) म्हणाले की, “सध्या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक नियमनाला प्राधान्य दिले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.