Sinhagad incident : एक सेल्फी पडली महागात; सिंहगडावर 8 ते 10 जणांना चावल्या मधमाश्या!

एमपीसी न्यूज : सिंहगडावर पर्यटनासाठी गेलेल्या एका ग्रुपवर मधमाशांनी (Sinhagad incident) जोरदार हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.  यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झाले. तर दोघेजण बेशुद्ध झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केली आहे. एक सेल्फी सर्वांना महागात पडल्याचे समोर आले आहे. 

उपस्थित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या कल्याण दरवाज्याजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. काही सेल्फी प्रेमी पर्यटक सेल्फी घेण्यास तेथे गेले होते. कल्याण दरवाज्याजवळ एका झाडावर खूप आग्या मधमाशांचे मोहोळ (मधमाशांचे पोळे) लागले होते.

त्या समूहातील एका तरुणाला त्या मोहोळाजवळ जाऊन सेल्फी मोह आवरला नाही. सेल्फी नीट येत नसल्याने मोहोळच्या अधिक जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा त्या तरुणाने प्रयत्न करताच झाडाची फांदी तूटून मधमाशा सहित मोहाळ खाली पडले. सोबत तरुणही खाली पडला.  आणि मधमांशांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केलाच सोबत आजूबाजूला असलेल्या 8-10 पर्यटकांवरही हल्ला केला. यामध्ये सर्व जखमी असून दोघेजण बेशुद्ध झाले आहेत.

Talegaon dabhade News : लग्नात मानपान न केल्याने वकील असणाऱ्या विवाहितेचा छळ, सनद घालविण्याची धमकी

आज रविवार असल्याने सिंहगडावर (Sinhagad incident) पर्यटकांची जास्त गर्दी असते. त्यात हा प्रसंग घडल्याने बऱ्याच जणांना इजा झाली आहे. जखमी झालेल्या सर्वांना तातडीने गडावरून उतरून रुग्णालयात नेण्यात आले. गडावरील माजी उपसरपंच अमोल पढेर, ओंकार पढेर, भाऊ जोरकर, दत्ता जोरकर नंदू जोरकर, वनपाल बाबासाहेब लटके, बाळासाहेब जिवडे आकाश बांदल, राकेश पन्हाळकर आणि कार्यक्रमातील स्वयंसेवक मदतीला धावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.