शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Nigdi News: मित्राने आवाजाकडे दुर्लक्ष केल्याने मारहाण

एमपीसी न्यूज – घरी सोबत जात असताना मित्राने आवाजाकडे दुर्लक्ष केल्याने दोघांनी एकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.10) साडे अकराच्या सुमारास ओटास्कीम निगडी (Nigdi News) येथे घडली.
याप्रकरणी राहुल राधेश्याम लखन (वय 21, रा. ओटास्किम, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय गायकवाड (वय 22  रा. ओटास्किम निगडी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राहुल व त्याचा मित्र कुणाल वडागळे घरी जात असताना आरोपीने कुणालला आवाज दिला. मात्र त्याने आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्यावरून  आरोपीने कुणालला शिवीगाळ व मारहाण केली. कुणालनेही आरोपींना शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपींनी  फिर्यादी राहुल यास हातातील लोखंडी कडे मारून जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. निगडी पोलीस (Nigdi News) अधिक तपास करत आहेत.
spot_img
Latest news
Related news