Wakad Crime News : बनावट चावीने दरवाजा उघडून सोन्याचे दागिने, रोकड लंपास

एमपीसी न्यूज – कस्पटे वस्ती, वाकड येथे अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने घर उघडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री उघडकीस आली.

विजय रमेश शेलार (वय 39, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. साखरी रोड, धुळे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 14 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते 18 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने फिर्यादी यांच्या घराचे लॅचलॉक उघडून आत प्रवेश केला. मुलांच्या बेडरूममधील कपाटाचे लोकर तोडून त्यातून 61 हजारांचे 27 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.