Sangvi Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला तर भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इसाक रजाक शेख (वय 29, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव) असे सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख याने विनाकारण विनापरवाना लोखंडी कोयता जवळ बाळगला. त्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

विक्रम महेंद्र यादव (वय 22, रा. दापोडी) असे भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यादव यानेही विनाकारण विनापरवाना लोखंडी कोयता जवळ बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.