Vadgaon Maval : पंचायत समितीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आढावा बैठक

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा निकाल विश्लेषण आढावा बैठक पार पडली. आज (शुक्रवारी, दि.11) झालेल्या बैठकीत शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100 टक्के लागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत शून्य टक्के निकाल असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या.

बैठकीस पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबर म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, रजनी माळी, राजश्री सटवे, कृष्णा भांगरे, रामराव जगदाळे उपस्थित होते.

सन 2021 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत शून्य टक्के निकाल असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक आणि संबंधित 5 वी व 8 वी वर्ग शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि पुढील वर्षी आपला शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% कसा होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सदर प्रसंगी शिष्यवृत्ती मार्गदर्शक श्रीकांत दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांची सातत्याने राज्यस्तरावर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत तसेच निगडे शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मंगल मस्तुद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी निगडे शाळेस 3 लाखाची मदत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषयतज्ञ ज्योती लावरे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री सटवे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.