Talegaon News : ट्रॅक्टरमधील ऊस पडल्याने जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मधील ऊस रस्त्यावर पडल्याने जुना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सुमारे एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला.

शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावरून ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या होत्या. ट्रोल्यांमध्ये भरपूर ऊस भरण्यात आला होता. तळेगाव सीआरपीएफ जवळ आल्यानंतर मुंबई लुने लेनवर ट्रॅक्टरमधील ऊस महामार्गावर पडला. सुमारे अर्धा ट्रॅक्टर ऊस रस्त्यावर पडला आणि भर रस्त्यात उसाचा ढीग लागला.

यामुळे मुंबई-पुणे लेनवर तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाली. लोणावळा, कामशेत, मुंबई कडून आलेली वाहने वाहतूक कोंडीत अडकली. सीआरपीएफ गेट समोरून विरुद्ध दिशेने वाहने गेल्याने वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली. या घटनेत ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.