Science Park : सायन्स पार्क येथे विविध विषयावर शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क (Science Park) व पिंपरी-चिंचवड विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रकल्प निर्मिती, मांडणी व विविध विज्ञान प्रदर्शन स्पर्धा व विविध शिष्यवृत्ती स्पर्धा परिक्षा याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा विज्ञान शिक्षकांसाठी शुक्रवारी (दि.26)  सकाळी 11 ते 5 या वेळात चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे तसेच पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पवळे सर, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विक्रम काळे आदी उपस्थित होते.

Chandni Chowk Traffick : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकात; आढावा घेऊन प्रशासकांना तातडीचे आदेश

सलग दोन ते अडीच वर्षानंतर (Science Park) विज्ञान शिक्षकांसाठी होणारी ऑफलाइन ही पहिलीच सभा होती. या कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तालुका संघाचे अध्यक्ष व समन्वयक असे एकूण 30 शिक्षक उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड मधील प्रत्येक शाळेतील एक विज्ञान शिक्षक याप्रमाणे 125 विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड विज्ञान अध्यापक संघातील सदस्यांनी सदर कार्यशाळेसाठी पूर्ण दिवसभर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजीव वाखारे व शिक्षणाधिकारी सुनील पोटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार चिंचवड सायन्स पार्कचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एन टी कासार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.