Pune Crime : फुकट साड्यांच्या नादात अडीच लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – फुकट साड्या मिळत आहेत. गर्दीमुळे तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा, म्हणत वयस्क महिलेने चक्क अडीच लाखांचे सोन्याचे (Pune Crime) दागिने गमावले आहेत. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान शनिवार वाड्यासमोर असलेल्या थोरला शेख दर्गा येथे घडली.

Khadki Cantonment Area : साखर वाटप करून वंदे मातरम संघटनेचे अनोखे आंदोलन

या प्रकरणी 59 वर्षीय वृद्ध महिलेने दोन अनोळखी इसमाच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या बहिणी जवळ येत आरोपींनी सांगितले की, आमच्या शेठला मुलगा झाला आहे, त्यामुळे ते गरिबांना फुकट साड्या वाटत आहेत. तेथे गर्दी असेल, तर तुम्ही तुमचे दागिने तुमच्या पिशवीत काढून ठेवा.

ती कापडी पिशवी आरोपींनी स्वतः जवळील पिशवीत ओतून घेतली. या दरम्यान हात चलाखीने आरोपींनी फिर्यादीचे सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी (Pune Crime) गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.