Chandni Chowk Traffic : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकात; आढावा घेऊन दिले प्रशासनाला तातडीचे आदेश

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी (Chandni Chowk Traffic) टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी संबंधित प्रशासनाला दिले. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे या प्रसंगी स्पष्ट करत वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे, असे निर्देश दिले. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्य रितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी, अशा सूचना देखील त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.

Pune Police : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन 738 गुन्हेगारांना अटक

यावेळी शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेत लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे याप्रसंगी त्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांदणी चौकात ट्राफिकमध्ये बराच वेळ अडकले होते. आणि याच वेळी स्थानिकांनी देखील रस्त्याच्या कडेला उभे राहून नेहमीच चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. यावर शिंदे यांनी तात्काळ ऍक्शन घेत संबंधित प्रशासकांना शनिवारी भेटण्यास बोलावले होते. आणि आज त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी चांदणी चौकातील कोंडी (Chandni Chowk Traffic) थांबवण्यास निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.