Pune Police : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 738 गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज- पुणे पोलिसांच्या वतीने (Pune Police) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. हे ऑपरेशन 27 ऑगस्ट रात्री नऊ ते 28 ऑगस्ट मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले, यामध्ये पोलिसांनी 3 हजार 295 गुन्हेगारांची तपासणी केली असून 738 गुन्हेगारांना अटक केली आहे.

यामध्ये हॉटेल, लॉजेस,एस.टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, निर्जन स्थळे यांची तपासणी करण्यात आली. यात पोलिसांनी आर्म अक्ट अतंर्गत एकूण 42 जणांना अटक केली आहे. यात पोलिसांनी 35 कोयते, 4 तलवारी व 3 पालघन असा एकूण अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Ranjangaon : रांजणगाव येथील महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन झाले सुरू; भाविकांची मोठी गर्दी

खंडणी विरोधी पथकाने रेशनिंग व अन्नधान्याचा अवैध साठा करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली असून 17 लाख 41 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकानेही कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्या जवळून  7 हजार 600 रुपयांचा 362 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांनी मिळून 17 तडीपार गुंडावरही कारवाई केली आहे. पोलीस नाकाबंदी मध्ये 2 हजार 252 संशयीतांवर कारवाई करून 34 जणांवर दंडात्मक कारवाई करत 8 हजार 300 रुपयांचा दंड वसून केला. वाहतूक शाखेनेही 1 हजार 249 वाहनांची तपासणी करून या कालावधीत 1 लाख 12 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला.

या कोंबींग ऑपरेसमध्ये पोलिसांनी पुणे आयुक्तालयाअंतर्गत येणारे 492 हॉटेल, ढाबे व लॉजेस यांची तपासणी केली. तर 145 एसटी स्टॅन्ड,रेल्वे स्थानके व निर्जन स्थळांची पाहणी केली. यापुढे पोलिसांची संपूर्ण गणेश उत्सवात गुन्हेगारावर करडी नजर असणार असून नागरिकांनाही (Pune Police) पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.