Chikhali News : चिखलीमध्ये भंगार गोदामाला आग

एमपीसी न्यूज – चिखली मधील एका भंगार गोदामाला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 5) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे एका भंगार गोदामाला आग लागल्याची वर्दी मध्यरात्री साडेबारा वाजता मिळाली. त्यानंतर रहाटणी, तळवडे, प्राधिकरण आणि चिखली येथील चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

चार बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले जात आहे. सोमवारी पहाटे पर्यंत आग धुमसत होती. आगीचे नेमके कारण आणि नुकसान याबाबत माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.