Lonavala News : पीएम कार्यालयाला पाठवलेल्या 75 लाख पोस्ट कार्ड मधून गौरी गायकवाड हिच्या पत्राची निवड 

एमपीसी न्यूज – पंतप्रधान कार्यालयाकडे देशभरातून पाठविण्यात आलेल्या 75 लाख पोस्टकार्ड पत्रातून, लोणावळ्यातील गौरी विशाल गायकवाड हीच्या पत्राची निवड झाली आहे. सुर्वण महोत्सवी भारत देश कसा असावा ? या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांकडून त्यांची मते मांडण्याची संधी पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली होती. गौरीची शाळा व लोणावळा पोस्ट कार्यालयाकडून नुकताच तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे प्राचार्य रामदास दरेकर, उपप्राचार्य आदिनाथ दहीफळे, पोस्ट मास्तर भरत गवळी, शाळेचे मुख्य लिपिक भगवान आंबेकर, कुंडलिक आंबेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोणावळा शहरातील व्ही.पी.एस हायस्कूल व द.पु. मेहता महाविद्यालयाची गौरी विद्यार्थीनी आहे. रिपब्लकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मावळ तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांची ती नात आहे. पोस्ट ऑफीस लोणावळा तर्फे प्रत्येक शाळेमध्ये पोस्ट कार्ड दिले होते. त्यामध्ये सुवर्ण महोत्सवी भारत देश कसा असावा? त्या बद्दल स्वतःचे विचार लिहून देशाचे माननीय पंतप्रधान ह्यांच्या नावानी पंतप्रधान कार्यालय येथे पाठविले होते त्यामध्ये संपूर्ण भारतामधून पाठविलेले 75 लाख पोस्ट कार्डमधून तिचे पत्र निवडले गेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.