Pimpri News: शहरासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्रकल्प उभारा; नाना काटे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजन, औषध आणि बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला होता. आता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असताना, तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी  शहर ऑक्सिजन उत्पादित होणे काळाची गरज आहे.

मागील महिन्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले. जिल्ह्यात ऑक्सीजन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यामुळेे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  केली.

यावर  अजितदादांनी तातडीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्त यांनी संयुक्त विद्यमाने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आदेश आज पुणे येथील बैठकीत दिला.

पुढील 10 वर्षाचा विचार करून दोन्ही शहरे व जिल्ह्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) प्रकल्प उभारता येईल का याबाबत माहिती द्यावी. मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रत्येक जिल्हा, महापालिका यांनी ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण व्हावे अशा सुचना दिल्या आहेत. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या – 19 च्या दुस-या लाटेमध्ये पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण भागातील रुग्णांना साधारण 480 मेट्रिक टन दरदिवशी आक्सिजनची गरज लागत होती. सदरील मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर जिल्हयातून 350 ते 380 टन ऑक्सिजन मागवावा लागत होता. तर अत्यावश्यक वेळी शेजारील राज्यातून आयात करून ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा प्राथमिक स्त्रोत नसून त्याऐवजी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वापर करता येईल. एलएमओ प्लांटकडून घेतलेला ऑक्सिजन हा प्राथमिक स्त्रोत असून त्याला सहायभूत म्हणून ऑक्सिजन प्लाट उभारण्याच्या दृष्टीनेेे तयार केला जावा.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्याची पुढील 10 वर्षाची गरज लक्षात घेता सुमारे 50 ते 100 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) स्त्रोत खात्रीचा  armarked (राखीव) असा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही महापालिका व जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( LMO ) प्लांट उभारणी करिता कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत. याकरिता पिंपरी महापलिकेसोबत पुणे महापालिका आणि पुणे ग्रामीण (जिल्हा परिषद) यांना सोबत घेऊन हा प्रकल्प उभारता येईल का ? याची चर्चा करून ऑक्सिजन प्लांट उभारणी करिता आदेश पारित करावे.

हा प्रकल्प तयार उभारणीकरिता राज्य शासन व प्रशासकीय स्तरावर सर्व परवानगी दिल्यास हा प्रकल्प तिसरी लाट येण्यापूर्वी 4 ते 5 महिन्यांमध्ये पूर्ण करता येईल. यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नगरसेवक काटे यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.