23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Shahu Maharaj Jayanti : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Shahu Maharaj Jayanti) वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून 25 जून  ते 26 जून 2022 या कालावधीत विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, शाहिरी जलसे असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.  नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभाग घेऊन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले. 

या प्रबोधन पर्वात शनिवार 25 जून रोजी सायंकाळी 7 वाजता साईमंदिर उद्यान,संभाजी नगर, चिंचवड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर जागर लोक परंपरेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

PCMC ITI : महापालिकेच्या आयटीआयमध्ये आता उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना राबविणार; विविध ट्रेड्स सुरू करणार

रविवार 26 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील राजर्षी शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस तर सकाळी पावणे अकरा वाजता के एस बी चौक चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता साईमंदिर उद्यान,संभाजी नगर, चिंचवड येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या  जीवनावर आधारित पारंपरिक (Shahu Maharaj Jayanti) पोवाडे, गीते आणि लोकगीतांचा कार्यक्रम होईल. यानंतर गौरव महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

spot_img
Latest news
Related news