BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शिवसेनेच्या गगनभेदी घोषणांनी ढवळून निघाला संत तुकाराम नगर परिसर..!

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ संत तुकाराम नगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली.

नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक यशवंत भोसले, युवा सेना अध्यक्ष अभिजीत गोफण, विभागप्रमुख राजेश वाबळे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र ननावरे, मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, पूजा वायचळ, मंजुषा लोहोट, अनुजा कुमार, भोलाराम पाटील, दातीर, महंमद आदी यावेळी परयात्रेत सहभागी झाले होते.

संत तुकाराम नगर येथील तुकाराम महाराज मंदिरापासून सुरू झालेली ही पदयात्रा वायसीएम हॉस्पिटल परिसर, महेशनगर, गंगानगर, चौपाटी, वल्लभनगर, सुखवानी क्लासिक सोसायटी आदी भागातून मार्गक्रमण करत समाप्त झाली.

रस्त्यात ॲड. चाबुकस्वार यांचे महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. ‘गौतम चाबुकस्वार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ‘शिवसेना जिंदाबाद’ या घोषणांनी संत तुकाराम नगर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून काढला.

HB_POST_END_FTR-A2

.