Maval : शिवणे येथील मंडल महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज शिवणे येथील मंडल महिला अधिकारी संगिता राजेंद्र शेरकर हिला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. (Maval) ही कारवाई आज (मंगळवारी) आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे करण्यात आली आहे.

संगिता यांच्या सह पोलिसांनी खासगी इसम संभाजी लोहोर याला देखील अटक केली आहे. याप्रकरणी माहिती अशी की, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मौजे भडवली तालुका मावळ येथील जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्याकरिता आरोपी लोकसेवक  व खासगी इसम यांनी 20 हजार रुपयांची लाच मागणी करून ही लाच रक्कम संगिता शेरकर यांनी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे स्वीकारल्यावर  पथकाने ताब्यात घेतले.

Pune News : बेळगाव तोडफोडीचे पुण्यात पडसाद, स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस अधिक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.