Poet Shanta Shelke : श्रीरंग कलानिकेतनची कवयित्री शांता शेळके यांना भाव सुमनांजली

एमपीसी न्यूज – कवयित्री शांता शेळके (Poet Shanta Shelke) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या  श्रीरंग कलानिकेतन या संस्थेने ‘असेन मी ..नसेन मी…’ या संगीत मैफिलीद्वारे शांता शेळके यांना भाव सुमनांजली वाहिली.

कांतीलाल शहा हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कांतीलाल शहा हायस्कूलच्या ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट चंदूभाई शहा, श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी व श्रीरंग कलानिकेतनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

‘जय शारदे वागेश्वरी’ या लीना परगी यांनी गायलेल्या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तोच चंद्रमा नभात (सम्राट काशीकर), काटा रुते कुणाला (संपदा थिटे), ही वाट दूर जाते अशा एकापेक्षा एक सुंदर गीतांनी मैफिलीत रंग भरला. ‘खोडी माझी काढाल तर’ या सम्राट काशीकर यांच्या कन्या अंतरा काशीकर यांनी गायलेल्या ठसकेबाज गाण्याने रसिकांची भरभरून दाद मिळवली. डॉ. सावनी परगीच्या ‘शालू हिरवा’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’, ’रेशमांच्या रेघांनी’ रसिकांना ताल धरायला लावला. राजीव कुमठेकरांच्या ‘दाटून कंठ येतो’, ‘ही चाल तुरु तुरु’, ‘असेन मी नसेन मी’ या गाण्यांनी रसिकांची (Poet Shanta Shelke) मने जिंकली.

संपदा थिटे यांच्या कसलेल्या आवाजातील ‘का धरिला परदेस, कान्हु घेऊन जाय’ या गीतांनी कार्यक्रमाची उंची वाढविली. लीना परगींच्या ‘दिसते मजला सुख चित्र नवे’ आणि ‘वादळ वार सुटल गं’ या गीतांना देखील दाद मिळाली. सम्राट काशीकर यांनी गायलेल्या शूर आम्ही सरदार आम्हाला’ व ‘माझे राणी’ या संपदा थिटेंच्या बरोबर गायलेल्या द्वंद्व गीताला प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळाली.

Transgender in Pune : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेचे क्रांतिकारक पाऊल

शेवटच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताच्या (Poet Shanta Shelke) जोशपूर्ण सादरीकरणाने सुंदर मैफिलीची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले. या मैफिलीला संवादिनी प्रदीप जोशी, सिंथसायजर राजेश झिरपे, तबला मंदार परगी, अनिरुद्ध जोशी. ढोलकी, ऑक्टोपॅड प्रविण ढवळे व तालवाद्य गंधार ढवळे यांची, ध्वनी योजना रवींद्र मेघावत यांची होती.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंग कलानिकेतनचे विनय कशेळकर, दिपक आपटे, सीमा आवटे, श्रीकांत चेपे, सुहास धस, काशिनाथ निंबळे, सुनील वाघमारे, विश्वास देशपांडे, रुपाली जवेरी, डॉ. राजेंद्र कुलकर्णी,  डॉ.किरण देशमुख, संजय साने आणि सर्व विश्वस्त मंडळ सदस्यांचे सहाय्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.