Shasan Aaplya Dari : लोणावळ्यात गुरूवारपासून शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन 

एमपीसीन्यूज – लोणावळ्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे नियोजित असलेले शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Dari) हे अभियान काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले होते. हे अभियान पुन्हा सुरू केले आहे. लोणावळ्यात गुरुवार (दि.12) पासून आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या अभियानाचे पुन्हा आयोजन केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन शासनाशी संबंधित कामे करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 शासन आपल्या दारी या अभियनांतर्गत लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये विशेषत: नवीन आधार कार्ड काढणे, आधारकार्डामध्ये दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे, खराब झालेली शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना, नवीन वीज कनेक्शन अर्ज स्विकृती, वीजबिल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,जात प्रमाणपत्र,जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र,  दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड नोंदणी करणे, तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या विविध योजना व कोविड प्रतिबंधात्मक लस देखील नागरिकांसाठी (Shasan Aaplya Dari) उपलब्ध होणार आहे.

लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 12) व शुक्रवारी (दि.14) नगरपरिषद शाळा क्रमांक-1, बापूसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी, व भोरी सॅनेटोरियम रायवुड. तर मंगळवारी (दि.17) आणि बुधवारी (दि.18) व्हीपीएस स्कूल गवळीवाडा, श्री साई मंदिर रामनगर भुशी, हॉटेल आदर्श शिवाजी पेठ खंडाळा.तसेच गुरुवारी ( दि.19) आणि शुक्रवारी (दि.20) स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय तुंर्गाली, महादेव मंदिर हॉल वलवण. याठिकाणी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे.

Mumbai News : मंत्रालयात 18 मे पासून सर्व सामान्य नागरिकांना मिळणार प्रवेश

तरी या अभियानात सहभागी होऊन नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा (Shasan Aaplya Dari) लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांना केले आहे.

लोणावळा शहरात यापूर्वी 12 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे कार्यक्रम रद्द झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.