Lonavala Accident News : खंडाळा घाटात सहा वाहनांचा भीषण अपघात; 4 जण ठार

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे सहा वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील 3 जण गंभिर तर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.

घटनेची माहिती समजताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना वाहनांमधून बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.