Special Editorial: श्रीगणेशा ‘शिक्षण संवाद’चा!

एमपीसी न्यूज (डॉ. अ. ल. देशमुख) – पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य ‘एमपीसी न्यूज’ चॅनेल बाबत सर्वजण सुपरिचित आहेत. शहरातील, राज्य व देशपातळीवरील ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या देखील ‘एमपीसी न्यूज’ने सर्वसामान्य नागरिक यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लोकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे ‘एमपीसी’चा उत्साह वाढला आहे. कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडी आणि विषयांवर संवाद साधण्याचा निर्णय ‘एमपीसी न्यूज’ने घेतला असून, त्यांनी ‘शिक्षण संवाद’ हा नवीन उपक्रम घेतला आहे.

मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत असे आपण मानतो पण आजच्या काळात शिक्षण ही चौथी सर्वात महत्त्वाची मूलभूत गरज बनली आहे. वेगवेगळ्या स्तरावरचे शिक्षण आज सुरू आहे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षण हा पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची सर्वत्र चर्चा आहे. पण ते धोरण नक्की काय आहे ? समाजात बदल घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण कारणीभूत ठरणार आहे असं सर्वजण म्हणतात त्याचा नेमका अर्थ काय ? याबाबतची माहिती आपल्याला अगदीच कमी माहिती आपल्याला असते. ‘एमपीसी न्यूज’ यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य करेल.

शिक्षण प्रवास सुरू झाल्यापासून ते आयुष्यात स्थिरस्थावर होईपर्यंत शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालकांना देखील शिक्षणाचे महत्त्व कळाले असून, ते पाल्याच्या शिक्षणाबाबत जागृत झाले आहेत. पालकांनी पाल्याच्या शिक्षणासाठी जागरूक राहणे आवश्यक आहे. ‘एमपीसी’ सृजन पालकांची भूमिका बजावत राहिल, त्याचा पालक आणि पाल्य यांना फायदा होईल. शिक्षणात समुपदेशन आणि करिअरच्या वाटा असे दोन विभाग आहेत. मुलांना अधिक चांगले करण्यासाठी तसेच पालकांना माहिती देण्यासाठी समुपदेशन केले जाते. तसेच करिअरच्या वाटा हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. करिअरमध्ये ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती आहे. पण याबाबत आपल्याला माहीत नसते. ‘शिक्षण संवाद’च्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा उहापोह केला जाणार आहे.

आजच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाला पर्याय नाही. यामध्ये अनेकाविध संधी आहेत. (उदा. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंन्टेलिजन्स, डेटा ॲनेलिसिस) याबाबत केवळ जुजबी ज्ञान असून उपयोगाचे ठरणार नाही. त्यासाठी एमपीसी याबाबत सुरवातीपासून ते अद्ययावत (बेसिक ते ॲडव्हान्स) माहिती देण्याचा प्रयत्न करेल. प्राथमिक स्तरापासून अनेक शिक्षक संधी उपलब्ध आहेत. याची माहिती एमपीसी न्यूज लेख मालिका, बातमी, मुलाखत व इतर गोष्टींमधून देत राहील.आपल्या येत असलेल्या देशातील प्रमुख भाषा यांच्यासोबत एखादी परदेशी भाषा देखील यायला हवी असा सध्या एक ट्रेन्ड सुरू आहे.

शिक्षण संवादाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली जाईल. जसं की, कोणती भाषा शिकता येईल, त्याचे क्लासेस कुठे सुरू आहेत, त्याचा अभ्यासक्रम काय ? अशी माहिती एमपीसी देईल. एवढंच नव्हे तर त्यासंबंधी शॉर्ट टर्म कोर्स देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण संवादाच्या माध्यमातून केला जाणार आहे. (उदा. फोटोग्राफी, संगीत, कला शिक्षण इ.) असे शिक्षण व्हिडिओ देखील पाहता येतील.

शिक्षण संवादला या उपक्रमाला आम्ही ‘व्यासपीठ’ असे म्हणतो. याच कारण असं की, सर्वच क्षेत्र आणि माहिती व विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी त्याला व्यासपीठ हा त्यासाठी योग्य शब्द ठरतो. एमपीसी न्यूज कडून नागरिकांना नववर्ष भेट काय द्यायची यावर बरीच चर्चा केल्यानंतर शेवटी शिक्षण हा विषय निवडण्यात आला आणि ‘शिक्षण संवाद’ या उपक्रमाला सुरूवात झाली. तुम्ही नेहमीप्रमाणे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद देत यात शंका नाही. तोपर्यंत बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी mpcnews.in ला भेट देत रहा आणि एमपीसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका…… धन्यवाद!

 

डॉ. अ. ल. देशमुख

मानद संपादक
MPC News शिक्षण संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.