Pune Crime : कोयता गॅंगचा बिमोड करण्यासाठी स्पेशल स्कॉड; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune Crime) हातात कोयते घेऊन सराईत गुन्हेगार, अल्पवयीन गुन्हेगार धुमाकूळ घालत आहेत. या गुन्हेगारांना रोखण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यानंतर आता पुण्यात घडणाऱ्या या गुन्हेगारी कृत्याची दखल राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी घेतली आहे.
हातात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून स्पेशल स्कॉड निर्माण करण्यात आले आहे. स्वतः रजनीश शेठ यांनी माहिती दिली.

पुण्यातील वानवडी येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन या ठिकाणी सुरू असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन रजनीश शेठ यांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.
रजनीश शेठ यांना शहरातील कोयता गॅंग यासंदर्भात प्रश्न (Pune Crime) विचारला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता यांची दखल घेतली आहे. कोयता गॅंगवर कठोर कारवाई करण्यात येईल यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष पथक निर्माण करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र पोलीस दल सक्षम आहे. 2022 मध्ये राज्यात कुठलीही अनुचित घटना घडली नाही. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे रजनीश शेठ म्हणाले. 

Pune Crime : धक्कादायक! आईनेच पोटच्या मुलीला फेकले कचऱ्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.