Pune accident : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू तर तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील तरुणीचा मृत्यू झाला तर (Pune accident) दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला. पुणे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी नाक्याजवळ बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पलक शिवहरे (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर भावेश पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. चिन्मय नागेंद्रमनी पांडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून अज्ञात वाहन चालका विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : रिक्षा चालकाला लोखंडी हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भावेश पाटील हा मैत्रीण पलक शिवारे हिला पुणे रेल्वे स्टेशन येथे सोडवण्यासाठी दुचाकीने जात होता. (Pune accident) यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने पलक हीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.