Sangvi News : एसटी कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – सांगवी येथे एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री घडली.

संजय बंकट सरवदे (वय 43, रा. एसटी कॉलनी, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर संजय बाथरूमध्ये गेले. बराच वेळ झाल तरी वडील बाहेर येत नसल्याने मुलांनी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिलं असता संजय यांनी गळफास घेतल्याच दिसून आले. मुलांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

संजय सरवदे हे वल्लभनगर एसटी आगारात काम करतात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. संजय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह मूळगावी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे नेण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.