Mumbai: महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोरोनाग्रस्तांनाही!

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी असून येत्या एक एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.