Talegaon : भरधाव कारची दुचाकीला धडक , दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या (Talegaon) कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला घटनास्थळी सोडून कारचालक पळून गेला. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री तळेगाव चाकण रोडवर तळेगाव दाभाडे येथे घडली.

विशाल देविदास शेलार असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रघुनाथ बगाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/जेई 4496) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : थकित मालमत्ताकर वसुलीची मोहिम तीव्र होणार; वसुली पथकातील कर्मचारी, एमएसएफ जवानांच्या संख्येत वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल शेलार हे त्यांच्या दुचाकीवरून तळेगाव चाकण (Talegaon) रोडने जात होते. ते नूतन कॉलेज जवळ आले असता भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाने दुचाकीस धडक दिली. यामध्ये शेलार गंभीर जखमी झाले. जखमी शेलार यांना घटनास्थळी सोडून कारचालक पळून (गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.