Talegaon : खूनी हल्ल्यातील आरोपीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर शनिवारी सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला झाला. या गुन्ह्यातील एका आरोपीला 16 तासाच्या आत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविराधी पथकाने अटक केली.

केतन दत्तात्रय पोकळे (वय 22, रा. सोमाटणे फाटा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह प्रसाद ऊर्फ परशा टेभेकर (रा. उर्से) आकाश साळुखे (रा. सोमाटणे फाटा) हर्षद भोकरे, (रा. शिवणे), अनु ऊर्फ अनराधा काळे (रा. तळेगाव दाभाड) व इतर दोन अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. रोहन दिनकर गरोडे असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी सायंकाळी फिर्यादी अदित्य विलास गराडे व रोहन दिनकर गराडे असे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून एका कंपनीमध्ये चहा घेऊन जात होते. परंदवडी – सोमाटणे रोडवरील ओढयाजवळ आरोपींनी आपसांत संगनमत करून रोहन गराडे यास पूर्वीचे भांडण्याचे कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केले.

याप्रकरणी तळेगाव दभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खंडणी विरोधी शाखेचे पोलीस नाईक शरीफ मुलाणी यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार साईनगर, देहरोड येथे सापळा रचून आरोपी केतन याला अटक केली. त्याने आपल्या साथीदारांसह केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्‍त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, अनिकेत हिवरकर कर्मचारी अजय भोसले, उमेश पलगम, निशांत काळे, किरण काटकर, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, सागर शेडगे, आशिष बनकर, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.