Talegaon crime News : सांगवडेत दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा; अडीच लाखांचे रसायन  नष्ट

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे गावात पवना नदीच्या किनारी सुरू असलेल्या देशी दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांनी छाप मारला. यामध्ये पोलिसांनी अडीच लाखांचे पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. 

शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सांगवडे गावात पवना नदीच्या किनारी अवैधरित्या एक दारुभट्टी सुरू असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मंगळवारी (दि. 24) मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी दारुभट्टीवर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी अडीच लाखांचे 25 हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त करून त्याची विल्हेवाट लावली.

शिरगाव पोलिसांनी सोमवारी (दि. 23) ओझर्डे गावात सुरू असलेल्या एका अवैधरित्या सुरू असलेल्या दारुभट्टीवर छापा मारला आहे. त्यात पोलिसांनी चार हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले.

सलग दुसऱ्या दिवशी शिरगाव पोलिसांनी अवैध दारुभट्टीवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.