Talegaon Dabhade: शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – चंद्रसेनराजे दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला तसेच पोलीस खात्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमंत सरदार चंद्रसेनराजे दाभाडे यांनी केले आहे. 

तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती,  किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 व 25 एप्रिल (शुक्रवार व शनिवार) रोजी सलग दोन दिवसाचा जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) घोषित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यूच्या काळात फक्त दवाखाने, औषध दुकान व सकाळी दूध विक्री यांनाच यातून सूट मिळणार आहे. बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. या जनता कर्फ्यूला चंद्रसेनराजे दाभाडे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

कोरोना संसर्गजन्य आजारामुळे तळेगावात नगरपरिषदेने शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले आहे. यापूर्वी  दि 9 व 10 एप्रिल, तसेच  16, 17, 18 एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. तळेगावकरांनी त्याला बंद ठेवून पाठिंबा दिला होता. प्रशासनाने वेळोवेळी घेतलेल्या या भूमिकेने पूर्ण तळेगाव परिसर कोरोना संसर्गमुक्त आहे. याच पद्धतीने यापुढे देखील सर्व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपापल्या घरी राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन चंद्रसेनराजे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.