Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांमधील डिजिटल ॲडीक्शन कमी करण्यासाठी इनरव्हील क्लबचा उपक्रम

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमधील डिजिटल ॲडीक्शन कमी करण्यासाठी (Talegaon Dabhade) इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व मास्टर माईंड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व पालक समुपदेशन सत्र राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असल्याची माहिती इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी दिली.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व मास्टर माईंड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा व पालक समुपदेशन अध्यक्षा वैशाली दाभाडे व अकादमीच्या प्रमुख व प्रकल्प प्रमुख शुभांगी कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कांतीलाल शाह स्कूल येथे संपन्न झाले.

या वेळी रो कमलेश कार्ले,ममता मराठे,साधना भेगडे,जयश्री दाभाडे, हेमलता खळदे,संगीता शेडे,शर्मिला शाह,निता देशपांडे,मीरा बेडेकर, आरती भोसले, वैशाली जामखेडकर, सुचित्रा कडवे,नवनीता चॅटर्जी,दीपाली चव्हान,उज्वला बागवे,स्नेहल निंबाळकर आदी उपस्थित (Talegaon Dabhade) होते.

या स्पर्धेमध्ये तळेगावातील विविध शाळांमधील 800 विद्यार्थ्यांनी व त्यांचे पालक देखील या वेळीस उपस्थित होते.श्री दिपक बोपे यांनी मार्गदर्शन केले,या वेळी अकॅडमी तर्फे अबॅकसचे प्रात्यक्षिक देण्यात आले

चित्रकला स्पर्धचे निकाल पुढील प्रमाणे

इयत्ता दुसरी –

1. दुर्वा शेलार (जैन इंग्लिश स्कूल)
2. अनुराग बिलरालकर (बालविकास विद्यालय)
3. सदाफ मेटकरी (सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल)

उत्तेजनार्थ –

श्रेयस बिरादार (स्वामी विवेकानंद स्कूल)
तन्वी दास (सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल)

इयत्ता तिसरी –

1. अदिती पाटील (बालविकास विद्यालय)
2. दुर्वा नंदुरकर (कांतीलाल शाह विद्यालय)
3. आली आहयान (बालविकास विद्यालय)

उत्तेजनार्थ –

श्रुती जाधव (स्वामी विवेकानंद स्कूल)
सावी आंद्रे (हचींग स्कूल)

इयत्ता चौथी –

1. साची मानावर (सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल)
2.  राही भोरे (कांतीलाल शाह विद्यालय)
3. ओजल त्रिमुखे (स्वामी विवेकानंद स्कूल)

उत्तेजनार्थ –

साची काळे (हचींग स्कूल )
आदीराज वाईकर (स्वामी विवेकानंद स्कूल)

इयत्ता पाचवी

1  मोहमद फैज (मामासाहेब खांडगे इग्लिश मिडीयम स्कूल)
2.  नाइस प्रजापती (स्वामी विवेकानंद स्कूल)
3.  आर्या गोपाळ (हचींग)

उत्तेजनार्थ –

ओम शेडे (जैन इंग्लिश मिडीयम स्कूल)
श्रेया बाबर (कांतीलाल शाह विद्यालय)

वैशाली दाभाडे यांनी कांतीलाल शाह विद्यालय व उपस्थित पालकांचे आभार मानले.

Kothrud : चंद्रकांत पाटील यांचा नागरिकांशी थेट भेट व संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.