Talegaon Dabhade : तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिल दणाईत यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे सचिव व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष अनिल गंगाधर दणाईत (वय 67 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ, जावई, नातू असा परिवार आहे.

शरद सहकारी बँकेचे मंचर शाखेतील वरिष्ठ अधिकारी सुनील दणाईत यांचे ते बंधू होत. आज मंगळवार सकाळी साडेदहा वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.