Talegaon Dabhade: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द

एमपीसी न्यूज – देशावरील कोरोना आजाराची आपत्ती लक्षात घेऊन यंदा वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

बबनराव भेगडे यांचा आज (शुक्रवारी) वाढदिवस आहे. वाढदिवस असला तरी कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत तसेच कोणीही शुभेच्छा देण्यासाठी समक्ष येऊ नये, असे आवाहन भेगडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

बबनराव भेगडे यांनी पत्रकात म्हटले आहे, ‘माझ्यावर प्रेम करणाऱ्या मावळ तालुकातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सांप्रदायिक व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर, युवक-युवती, महिला-माता, भगिनींना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की, जगभरात कोरोनो या रोगाच्या लढ्यात सहकार्य करावे, म्हणून जनहितासाठी शुक्रवार दि. 20 मार्च 2020 रोजी वाढदिवस रद्द करण्यात आला असून कोणीही घराबाहेर पडू नये व भेटी-गाठी टाळाव्यात. स्वच्छता राखावी व शासनाच्या सूचनांचे पालन करावे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.