Talegaon Dabhade News : भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास संघटनेच्या शहराध्यक्षपदी राजेश बारणे

एमपीसी न्यूज – अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संघटनेची तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी पत्रकार राजेश खंडेराव बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करून नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

अण्णा हजारे प्रणित भष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संघटनेची तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी शुक्रवार (दि 18) रोजी सुशिला मंगल कार्यालय येथे जिल्हा संघटक माजी नगरसेवक अरुण माने तालुका अध्यक्ष ॲड्.संजय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला याप्रसंगी नियुक्ती पत्र प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी पत्रकार राजेश खंडेराव बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली.त्याच बरोबर उपाध्यक्षपदी नवनाथ मारूती कुल, कार्याध्यक्षपदी दिलिप शंकरराव चौधरी, सचिवपदी प्रा. योगेश अर्जुन घोडके यांची निवड करण्यात आली. तसेच जमीर नालबंद यांची मावळ तालुका कार्याध्यक्षपदी तर ॲड्.गणेश जगताप यांची तालुका कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना तालुका अध्यक्ष संजय पाटील आणि जिल्हा संघटक अरुण माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.