Talegaon Dabhade : पिढीतील अंतर आणि मानसिक संतुलन विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज – दोन पिढ्यांमध्ये निर्माण (Talegaon Dabhade) होणारे वैचारिक, भावनिक अंतर समजून घेत मानसिक संतुलन कसे राखावे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या पुढाकारातून नगरपरिषद शाळा क्रमांक पाच येथे घेण्यात आली.

पिढीतील अंतर आणि मानसिक संतुलन कसे राखावे या बाबतीत मार्गदर्शन कार्यशाळा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या पुढाकारातून नगरपरिषद शाळा क्र 5 येथील विद्यार्थीनी व त्यांचे पालक यांचे मानसिक संतुलन कसे राखावे व पिढीतील अंतर आणि त्यांच्यातून येणारे प्रसंग कसे हाथळावे या विषयी मार्गदर्शन डॉ. लता पुणे यांनी केले.

YCMH News: मृतदेहाची अदलाबदल; अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड

पालकांनी आपल्या स्वतः आणि पाल्यामध्ये (Talegaon Dabhade) मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे असे वैशाली दाभाडे यांनी या प्रसंगी सांगितले. या वेळी डॉ. लता पुणे,अध्यक्षा वैशाली दाभाडे, सचिव निशा पवार, मुग्धा जोर्वेकर, शाळा क्र 5 च्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, शिक्षकवर्ग, विद्यार्थीनी व त्यांचे पालक बहूसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.